Aaditya Thackeray नार्को टेस्टला का तयार नाही? शिवसेना आमदाराचा सवाल

91
Aaditya Thackeray नार्को टेस्टला का तयार नाही? शिवसेना आमदाराचा सवाल
  • खास प्रतिनिधी 

राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांनी विधान परिषद सभागृहात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नार्को टेस्टला का तयार होत नाहीत, असा सवाल केला.

(हेही वाचा – ICC Panel of Umpires : आयसीसीच्या पंचांच्या पॅनलमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय पंच)

३७६ कलम लावा

गवळी यांनी बुधवारी, २६ मार्च २०२५ या दिवशी एका मुद्द्याद्वारे या विषयाला तोंड फोडले. त्या म्हणाल्या वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन प्रकरणात सामूहिक अत्याचाराचे ३७६ कलम लावायला हवे होते असे मत व्यक्त केले. या प्रकरणाचा तपास खूप धीम्या गतीने सुरु आहे असा आरोप गवळी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच या प्रकरणी राज्य सरकारने या गंभीर प्रकरणात तपासाचा वेग वाढवावा, अशी मागणी केली. (Aaditya Thackeray)

(हेही वाचा – Santosh Deshmukh हत्येचा खटला कसा चालणार? सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी दिली महत्त्वाची माहिती)

कारवाई करणार

यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, हे प्रकरण पाच वर्षे जुने असले तरीही दिशा सालियन यांच्या वडिलांनी या प्रकरणात जी नवी माहिती राज्य सरकारच्या गृह विभागाला दिली आहे त्या माहितीच्या आधारावर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, विधानसभेमध्येही या विषयावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लक्ष वेधले. (Aaditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.