Vidhan Parishad Election: आदित्य ठाकरेंसह शिवसेना आमदारांना ‘वाहतूक कोंडी’चा फटका!

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून सर्वपक्षीय आमदार आता विधानभवनात दाखल होताना दिसताय. मात्र मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकल्याची माहिती गेल्या काही वेळापूर्वी मिळाली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीच कोणत्याही कारणाने वाहतूक मंदावलेली असते. दरम्यान, ‘वाहतूक कोंडी’चा फटका विधानसभा मतदानासाठी पोहोचत असलेल्या आमदारांना बसला आणि त्यांना विधान भवनात पोहोचण्यास विलंब झाला.

(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ३ आमदारांमुळे धाकधूक वाढली; अद्याप मुंबईत पोहोचलेच नाहीत!)

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून एकूण १० जागांसाठी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. आतापर्यंत १०० हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई अनेक उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. सकाळी पाऊस सुरू झाल्याने सामान्य नागरिकांसह सेना आमदारांना देखील या ‘वाहतूक कोंडी’चा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here