शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification Case) सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर पुढील आठवड्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय देऊ शकतात.
(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या मदतीने काठमांडू येथे अडकलेले ५८ भाविक मायदेशी परतले)
10 जानेवारीच्या आत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईचे वेळापत्रकही येत्या काही दिवसांत ठरवले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) आमदारांचीही सुनावणीही पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे (Shivsena) जवळपास 40 आमदार बाहेर पडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांनी सोडवावे, असे निर्देश दिले होते. तसेच या प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीच्या आत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
सुनावणी पूर्ण
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर नार्वेकरांनी सुनावणी पूर्ण करून आपला निर्णय राखून ठेवला. आता हा निकाल पुढील आठवड्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर सध्या या प्रकरणाचा निकाल लिहिण्यात व्यस्त असल्याचे समजते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community