Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर होणार पुढील आठवड्यात सुनावणी

एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे.

234
Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर होणार पुढील आठवड्यात सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आदेशाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शिवसेनेच्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा – Ashish Shelar : चार सदस्यीय प्रभाग रचनाही “नगरराज बिलाला” अपेक्षितच – ॲड. आशिष शेलार)

७ मार्च रोजी होणार सुनावणी :

शिवसेनेच्या या आमदार अपात्रतेचे प्रकरणं (Shiv Sena MLA disqualification) सर्वोच्च न्यायालयाच्या यादीत मेन्शन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सरन्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मेन्शन केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ७ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Customs Department: मध्ययुगीन काळातील ५ खंजीर, १ दुर्मीळ दमास्कस पोलादी घडीचा चाकू सीमाशुल्क विभागाकडे सुपूर्द)

ठाकरे गटाला दिलासा :

एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena MLA disqualification) हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.