राजकीय वर्तुळातून एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आमदार रमेश लटके हे आपल्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
असा घडली घटना
बुधवारी रात्री अचानक रमेश लटके यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५२ वर्षांचे होते. आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसापूर्वी अंधेरी पूर्वेत होली फॅमिली ग्राउंड मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब व मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते बुधवारी पहिल्यांदाच दुबईला आपल्या सहकुटुंब सोबत फिरायला गेले होते. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत, असी माहिती दिली आहे.
Maharashtra | Shiv Sena MLA from Andheri East Ramesh Latke passes away due to a heart attack
— ANI (@ANI) May 11, 2022
(हेही वाचा – खुशखबर! ‘या’ दोन्ही रल्वे मार्गावर धावणार २० नव्या एसी लोकल गाड्या)
आमदार लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही बातमी कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार लटके यांचे पार्थिव मुंबईत आणन्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.
रमेश लटके यांच्याबद्दल…
- रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
- गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली.
- रमेश लटके यांनी १९९७ ते २०१२ दरम्यान सलग ३ वेळा नगरसवेक पद भूषवले.
- २०१४ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना पराभूत करुन लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले होते.
- २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते.