ED ने केलेल्या कारवाईनंतर प्रताप सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

130

एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए अॅक्ट म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (PMLA) अॅक्ट अंतर्गत त्यांची ही प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील सरनाईक यांचे दोन फ्लॅट आणि इतर मालमत्तेचा यात समावेश आहे. या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

ईडीने केलेल्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक म्हणाले, गेल्या आठवड्यात ईडीनं माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेली आहे. त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे उत्तर देत आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे 30 दिवसाच्या आत ईडीच्या या नोटीसविरोधात न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले वाद-प्रतिवाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय नेता म्हणून अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्य यांच्या संघर्षातून ही कारवाई होत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे.

(हेही वाचा – शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना ED चा दणका! 11 कोटींची मालमत्ता जप्त)

कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

दरम्यान,  2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर कारवाई झाली होती. मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती. त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की, तुमच्यावरील कारवाई संपली का? परंतु, मी त्यानंतर कायदेशीर लढाई लढतोय, असे प्रताप सरनाईक म्हणाले. तर, ईडीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.

पुढे प्रताप सरनाईक असेही म्हणाले की, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याने मी ही लढाई भविष्यातही लढणार आहे. एनएसईएल म्हणजे काय हे मी तपासतोय. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिल्यानंतर मी ईडीला सहकार्य केलं असून गेल्या आठवड्यात ईडीची नोटीस मिळाली होती असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.