औरंगाबादच्या वैजापूर येथील शिवसेना आमदारामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील रमेश बोरनारे यांच्या विरोधात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या जबाबानंतर त्यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात असताना रमेश बोरनारे आणि इतरांनी एका महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. मात्र त्यावेळी पोलिसांनी राजकीय दबावाखाली विनयभंगाचे कलम लावले नसल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे पोलिसांवर देखील टीका केली जात होती. अखेर पीडितेचे जबाबानंतर या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेनेसह रमेश बोरनारे याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – #TheKashmirFiles: गोवा, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत ‘फिल्म जिहाद’)
संबंधित महिला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. यामुळे रमेश बोरनारे, त्यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांना त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील वैजापूर पोलिसांनी रमेश बोरनारे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदाराच्या पीए यांनी भांडण सोडत असताना आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून महिलेविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, असल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.