मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती ‘या’ आमदाराची ८ तास चौकशी

160

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती समजले जाणारे आमदार रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीय सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. त्या जमीन व्यवहारात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचेही नाव आहे. वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर ईडीकडून अचानक वायकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रविंद्र वायकर मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. या दरम्यान मातोश्री क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या आरोपांवरुन ईडीने वायकरांची सात तास चौकशी केली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर रविंद्र वायकर घरी आले.

(हेही वाचा हिवाळी अधिवेशन: ‘त्या’ आठ जणांमुळे प्रशासन चिंतेत)

किरीट सोमय्यांनी काय केला होता आरोप?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा रायकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर आणि ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगले असल्याचा दावा केला होता. तसेच या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला नव्हता किंवा ती माहिती निवडणूक आयोगापासून लपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच संबंधित जागेवरील एका बंगल्याची किंमत पाच कोटी इतकी होती, असा दावा सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी यांसह अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांवरुन रविद्र वायकर यांनी त्यांना मानहानीची नोटीस बजावली होती. त्यानंतर आता रविंद्र वायकर यांच्या ईडी चौकशीची बातमी समोर आली आहे. याआधी देखील शिवेसेनेच्या काही नेत्यांना ईडीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसुळ या शिवसेना नेत्यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.