शिवसेनेच्या आमदाराकडून Kunal Kamra च्या ‘माज’वर कारवाईचा इशारा

68
शिवसेनेच्या आमदाराकडून Kunal Kamra च्या ‘माज’वर कारवाईचा इशारा
  • प्रतिनिधी

कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कामरा आणि माझा डीएनए सारखाच असल्याचे वक्तव्य शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट राऊत यांना शिवीगाळ केली. यामुळे विधानभवन परिसरात मोठा गदारोळ झाला.

संजय राऊत यांचे विधान आणि त्यावर गायकवाडांचा हल्लाबोल 

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “कुणाल कामरा (Kunal Kamra) चुकला असेल तर कायद्याने कारवाई करावी. मात्र, कामरा आणि माझा डीएनए सारखाच आहे.” राऊत यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड भडकले आणि त्यांनी पातळी सोडून अपशब्द वापरत राऊत यांना शिवीगाळ केली.

(हेही वाचा – Pandharpur : हिंदु महासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी यांची सावरकर चरित्रग्रंथाने ग्रंथतुला)

कामराला धमकी

गायकवाड म्हणाले, “कामराने (Kunal Kamra) माफी मागणार नाही, असे म्हणत जी मुजोरी दाखवली आहे, ती पाहता त्याला चांगलाच माज चढलाय. ही मस्ती कोणाच्या भरोशावर आहे? कोण कामराच्या पाठिशी आहे? त्याचा माज आमचे शिवसैनिक उतरवल्याशिवाय राहणार नाही.”

“कामराला (Kunal Kamra) महाराष्ट्रात येऊ द्या, मोकळं फिरू द्या, मग त्याचा माज उतरवतो,” असा थेट इशाराही संजय गायकवाड यांनी दिला.

(हेही वाचा – Vidya – Sapno Ki Udan चित्रपटाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष प्रिमियर शो)

राजकीय वातावरण तापले

राऊत यांच्या ‘डीएनए’ वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदाराने अशा पद्धतीने खासदारावर केलेली शिवीगाळ ही अभूतपूर्व असून, यावरून सत्ताधाऱ्यांची बेताल भाषा पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.