शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला उभारी देण्यासाठी सज्ज होत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात जात शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका करत आहेत.
शिंदे गटाचे सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांना आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आव्हान आता सत्तार यांनी स्वीकारलं आहे. मी राजीनामा द्यायला तयार असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.
मी तयार आहे
मी 31 जुलै रोजी माझ्या आणदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी हे नक्की केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा राजीनामा नाकारल्यास मी काहीही करू शकत नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना 50 आमदारांचा विचार करायचा आहे त्यासोबतच त्यांना राज्य देखील चालवायचं आहे. मात्र माझ्या राजीनाम्यासंदर्भात माझे मत मी स्पष्टपणे मांडणार आहे, असं सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
ठाकरेंचं आव्हान
शिवसंवाद यात्रे दरम्यान शिंदे गटातील आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे त्यांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत. आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि हिंमत असेल तर निवडून येऊन दाखवा, असं आव्हान त्यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांना करण्यात येत आहेत. त्यामुळेच त्यांचं हे आव्हान आपण स्वीतारलं असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
मोठी सभा घेणार
शिवसंवाद यात्रेदरम्यान आमच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे आले पण आमच्या मतदारसंघात आले नाहीत. महाराष्ट्रात कुठेही झाली नसेल इतकी मोठी सभा आपण आपल्या मतदारसंघामध्ये घेणार आहोत, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community