शिवसेना खासदार मुख्यमंत्र्यांवर नाराज, राऊतांसमोर वाचला तक्रारींचा पाढा!

91

सोमवारी नवी दिल्ली येथे शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी आपली नाराजी व्यक्त करत, तक्रारींचा पाढा वाचला आहे. शिवसेनेतील राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंसोबत तुमची भेट घडवून आणणार असल्याचे राऊतांनी खासदारांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री भेटत नाहीत

शिवसेना कमकुवत असल्याची भावना या बैठकीत शिवसेना खासदारांनी व्यक्त केली आहे. सोबतच, मुख्यमंत्री भेटत नसल्याची नाराजीही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सोमवारी झालेल्या बैठकीत तीन तास मंथन केले गेले. मराठवाडा आणि विदर्भ येथे जे शिवसंपर्क अभियान राबवण्यात आले होते. तिथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा: लालपरी लवकरच पुन्हा धावणार,महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय! )

शिवसेना कमकुवत होत आहे

शिवसेनेचे मंत्री भेटत नाहीत, तसेच नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मदत केली जात नाही. त्यामुळे पक्ष कमकुवत होत चालला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीसुद्धा खासदारांकडे त्याचबरोबर आमदारांकडेही दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्याचे खासदारांकडुून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे पालकमंत्री ज्या ज्या ठिकाणी आहेत. तिथे निधी वाटपात कुचराई केली जाते. योग्य वाटप केले जात नाही, तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. शिवसनेच्या संपर्क प्रमुखांनाही सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि स्वपक्षीय शिवसेनेतील महत्त्वाचे नेते या दोघांवरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.