Milind Deora यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

146
Milind Deora यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नोकऱ्यांमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना आणि भाडेकरुंना आरक्षण लागू करावे, अशी मागणी राज्यसभेतील शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यामुळे गिरणी कामगार आणि भाडेकरुंचा उपजिविकेचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. (Milind Deora)

मुंबईचे हात बळकट करण्यात इथल्या गिरणी कामगारांचा आणि भाडेकरुंचा मोठा वाटा आहे. शहराच्या विकासात या दोन्ही घटकांचे नुकसान झाल्याचे खासदार देवरा यांनी पत्रात म्हटले आहे. पुनर्विकासात गिरणी कामगारांच्या (Mill Workers) कुटुंबाचे आणि भाडेकरुंचे विस्थापन होते आणि त्यांच्या उपजिवीकेचे साधन नष्ट होते. या समस्येवर मात करण्यासाठी मुंबईत निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये गिरणी कामगारांच्या कुटुंबियांना आणि भाडेकरुंना आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली आहे. (Milind Deora)

(हेही वाचा – Raj Thackeray यांचं ठरलं ! पदाधिकारी मेळाव्यात म्हणाले, “विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा स्वबळावर लढणार”)

दक्षिण मुंबईत ज्या गिरण्यांच्या जमिनीवर मॉल्स उभारले जात आहेत तिथेच गिरणी कामगार आणि भाडेकरुंच्या कुटुंबियांना नोकरी देऊ शकतो. या धोरणामुळे पात्र कुटुंबांना केवळ रोजगाराच्या संधीच उपलब्ध होणार नाहीत तर शहराच्या विकासात त्यांना सहभागी होता येईल, असे खासदार देवरा (Milind Deora) यांनी म्हटले आहे. या प्रस्तावावर विचार करुन एक धोरण निश्चित करण्यासाठी एक उच्चाधिकार समितीची स्थापना करावी अशी विनंती खासदार देवरा यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार मिलिंद देवरा यांनी या पत्राद्वारे दिली. (Milind Deora)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.