राहुल शेवाळेंच्या गटनेते पदाच्या निवडीला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता 

89

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाकडून एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीनंतर लोकसभेतही ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शेवाळे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी, 19 जुलै रोजी दुपारी भेट घेतली. दिल्लीत हे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. या बारा खासदारांनी काही वेळापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली होती आणि त्यांचा गटनेता म्हणून राहूल शेवाळेंना मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

(हेही वाचा २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा हे खासदार का गप्प होते? – संजय राऊतांचा सवाल)

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांची नावे

  • श्रीकांत शिंदे – कल्याण
  • राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई
  • हेमंत पाटील- हिंगोली
  • प्रतापराव जाधव- बुलडाणा
  • कृपाल तुमाणे- रामटेक
  • भावना गवळी- यवतमाळ- वाशिम
  • श्रीरंग बारणे- मावळ
  • संजय मंडलिक- कोल्हापूर
  • धैर्यशील माने- हातकणंगले
  • सदाशिव लोखंडे- शिर्डी
  • हेमंत गोडसे- नाशिक
  • राजेंद्र गावित- पालघर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.