“राज्यातील जनता महाराष्ट्रातील नव्या सरकारला स्वीकारणार नाही”

राज्यातील जनता महाराष्ट्रातील नव्या सरकारला स्वीकारणार नाही, आम्ही जनतेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झोकून काम करणार आहोत आणि पुन्हा शिवसेनेला उभारी देण्याचे काम करणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाणार आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. इतकेच नाही तर बाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे आग, त्यामुळे या आगीशी खेळू नका, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

पुढे राऊत बोलताना असेही म्हणाले की, शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले आहेत, परंतु शिवसेना कधीही खचणार नाही, लढणार असल्याचे राऊत मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: विधानभवनातील शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील)

…तर आज फडणवीस हे मुख्यमंत्री असते

फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर यासंदर्भात राऊतांना विचारले असता, ते म्हणाले बाळासाहेबाचे आशीर्वाद तुम्हाला लाभले असते तर आज तुम्ही मुख्यमंत्री असतात. बाळासाहेब ठाकरेंचे नाव हे आग आहे, त्यामुळे आगीशी कोणीही खेळण्याचा प्रयत्न करू नका, आतापर्यंत ज्यांनी या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे फक्त हात नाही तर राजकीय कारकीर्द देखील पोळली असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या सरकारला जनता स्वीकारणार नाही

महाराष्ट्रातील नव्या सरकारला जनता स्वीकारणार नाही, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे नेणार आहे. हीच शिवसेना भविष्यात राज्याचं नेतृत्व करेल, असा विश्वास राऊतांना व्यक्त केला. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केलेत पण ते वार पचवून शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहिली, असल्याचे त्यांनी पुन्हा म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here