गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडी कडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असून सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. मात्र, आर्थर रोड तुरूंग प्रशासनाने उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारली. मात्र, त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी हे वृत्ता फेटाळल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 19 सप्टेंबरपर्यंत वाढला मुक्काम)
मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्थर रोड तुरूंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊतांची भेट घेण्यास उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण तुरूंग प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. संजय राऊतांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंना न्यायालयाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड तरूंग प्रशासनाने दिले आहेत. जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊतांना भेटायला द्यावे, असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर ऑर्थर रोड तुरूंग प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन या… असा निरोप दिला.
दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.
Join Our WhatsApp Community