Patra Chawl Case: राऊतांचा दसरा मेळावा कोठडीतच; 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

149

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे. कारण संजय राऊतांचा आर्थर रोड कारागृहामधील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली असून १० ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. दरम्यान, १० ऑक्टोबर रोजीच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यासह राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणीही एकाचवेळी होणार आहे.

(हेही वाचा – औरंगाबादमध्ये जुगार अड्यावर पोलिसांची धाड; पाच लक्झरी कारसह पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)

न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना जूनमध्ये ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊतांना न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. या कोठडीत पुन्हा वाढ केल्याने यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात संजय राऊत हजर राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

काय आहे प्रकरण

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.