गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडी कडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहे. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी त्यांची मागील सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.
(हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद हायवेवर 118 किमी.च्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट!)
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.
#UPDATE | Mumbai: Special PMLA court extends Shiv Sena MP Sanjay Raut's judicial custody till 19th September, in the Patra Chawl land scam case. https://t.co/tOEHEsHB5k
— ANI (@ANI) September 5, 2022
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.
Join Our WhatsApp Community