रविवारी झालेल्या पुण्यातील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडी, मुख्यमंत्र्यांपासून शरद पवारांपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त असून त्यांच्यावर उपचारांची आवश्यकता असल्याची टीका केली. यासह अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी राज यांना पुन्हा डिवचलं आहे.
काय म्हणाले राऊत…
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशातही भाजपचे सरकार आहे. त्यांना अयोध्येत जाण्यापासून कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार असा प्रतिसवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. महाराष्ट्रात भाजपाचा पाठिंबा असलेल्या आणि यूपीत भाजपाचीच सत्ता असूनही तुम्ही अयोद्दा दौरा कसा करू शकत नाही? खासदाराने माफी मागितली असेल तर तुम्हांला तुमची भूमिका घेता आली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी हा ट्रॅप असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांना अडकवू देणार नाही म्हणत हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले. मात्र हा ट्रॅप नेमका कोणाचा होता, असा सवाल सध्या विचारण्यात येत आहे.
(हेही वाचा – चंद्रपूरात डिझेल टँकर-ट्रकचा अपघात, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत)
संजय राऊत पुढे असेही म्हणाले, तुम्हाला कोणी विरोध करत आहे तर झुगारून जावा, तुम्ही नेता आहात कोणी एक खासदार विरोध करतो तर एक भूमिका घ्या, तुम्ही दौराच रद्द केला आहे, असे म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. तर उद्धव ठाकरे आमच्या पार्टीचे सेनापती आहेत. आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या त्यांच्या पार्टीवर नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community