… तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊतांचा थेट इशारा

89

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याबाबत शिवसेना सहमत नसल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वीर सावरकरांविषयी केलेले चुकीचे विधान शिवसेनेला मान्य नाही आणि शिवसेना ते कधी सहन करणार नाही. सध्या महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांची बदनामी करणे हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मान्य नाही. मात्र या यात्रेदरम्यान, राहुल गांधींना वीर सावरकरांबाबत कोणताही विषय काढण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा थेट इशारा राऊतांनी राहुल गांधींना दिला आहे. यासह सावरकर हे आमचे श्रद्धास्थान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले राऊत

इतिहास काळात काय घडलं किंवा काय नाही, यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा, या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावे. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. सातत्याने आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाहीत, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तुम्ही सावरकरांना भारतरत्न द्या. केवळ नकली आणि ढोंगी प्रेम दाखवू नका, असा टोला त्यांनी लगावला.

(हेही वाचा – वीर सावरकरांबद्दलचं वक्तव्य पडलं महागात; राहुल गांधींविरोधात शिंदे गटाची पोलिसांत तक्रार)

सावरकर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. सावरकर हे त्यांचे आदर्श पुरुष कधीच नव्हते, असे इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी त्यांनी सावरकरांचा विषय घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. तो आजचा नाही, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.