ठाकरे गटाच्या दुस-या राऊतांची जीभ घसरली, शिंदे गटाचा उल्लेख करताना घातली शिवी

उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अनेकदा विरोधकांवर आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेत टीका करण्यात आली आहे. पण राऊत सध्या तुरुंगात असताना उद्धव ठाकरे गटाचे दुसरे खासदार विनायक राऊत यांनीही आता संजय राऊतांचा कित्ता गिरवल्याचे पहायला मिळत आहे.

रविवारी एका जाहीर सभेत शिंदे गटावर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी शिंदे गटाचा शिवराळ भाषा वापरत उल्लेख केला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या दुस-या राऊतांनी देखील शिवराळ भाषा सुरू केल्याची चर्चा होत आहे.

राऊतांनी घातली शिवी

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांवर शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेत संजय राऊत यांनी जाहीर सभेत टीका केली होती. त्यानंतर रविवारी शिंदे गटावर टीका करताना विनायक राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली. उद्धव ठाकरेंना एकटे शिवसेना संपवायची,शिवसेनेचं नाव संपवून टाकायचं आणि या 40 गद्दारांच्या माध्यमातून शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्याचा डाव रचला जात असल्याचे सांगत राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना शिवी घातली.

(हेही वाचाः शिंदे गटाचा भाजपलाही ‘दे धक्का’, मुंबईत 100 पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश)

आपल्याला रस्त्यावर उतरायचे आहे

त्यांचा हा डाव आपल्याला उधळून लावायचा आहे. ही शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे, ती कधीही तुमच्या बापजाद्यांची होऊ शकत नाही. हे त्यांना दाखवून देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचे आहे, असे आवाहनही राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा अडाणी उल्लेख

उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचं काम हे शिंदे सरकारने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू माणसावर सध्या वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. अडाण्याच्या हाताखाली त्यांना काम करावं लागत आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा अडाणी असा उल्लेख केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here