बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना! शिवसेनेच्या कार्यकारणीत ठराव मंजूर

83

स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, आधी नाथ होते आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला. या बैठकीत संजय राऊत यांनी ठराव मांडले.

एकनाथ शिंदे, रामदास कदमांवर कारवाई नाही

दरम्यान, शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा फडकवायचा, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना रामदास कदम यांना शिवसेना नेतेपदावरून हटवण्यात आले नाही.

(हेही वाचा शिवसेनेची फरपट)

कोणते ठराव मंजूर?

  • पक्षप्रमुखांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार
  • शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे
  • त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
  • शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
  • बाळासाहेब ठाकरे यांचे नाव फक्त शिवसेनेलाच वापरण्याचा अधिकार असेल, कुणी बंडखोर या नावाचा वापर करू शकत नाही
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.