शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! पक्षप्रमुखपदी कोण?

128

शिवसेनेतून मोठा उठाव करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेची जुनी कार्यकारिणी आता बरखास्त झाली असून, संजय राऊत यांचा प्रवक्ते पदावरुन पत्ता कट करण्यात आला आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांना कायम ठेवण्यात आले आहे. मात्र याबाबत अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अशी आहे नवी कार्यकारिणी

शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची निवड झाली आहे. तर शिवसेना नेते म्हणून रामदास कदम, आनंदराव अडसूळ तसेच विजय नाहटा, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, शरद पोंक्षे, शिवाजीराव अढळराव पाटील, यशवंत जाधव यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचाः शिंदे गटाच्या बैठकीत १४ खासदार ऑनलाईन?)

खासदारही करणार जय महाराष्ट्र

आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये घेतलेल्या बैठकीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाणे, भावना गवळी, हेमंत पाटील,प्रतापराव जाधव,श्रीरंग बारणे, संजय मंडलिक,सदाशिव लोखंडे,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, धैर्यशील माने हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.