मंगळवार सकाळपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत शिवसेनेचे अवघे 18 आमदार उपस्थित होते. 55 आमदारांपैकी केवळ 18 आमदारांनी बैठकीला हजेरी लावल्याने, उरलेले सगळे आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत राजकीय भुंकप आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला फक्त 18 आमदार उपस्थित होते. वर्षावरील बैठक संपली असून, आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे अद्याप नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत किती आमदार आहेत ते अद्याप अस्पष्ट आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्रात सत्तांतरण? अमित शहा उपराष्ट्रपतींच्या भेटीला; दिल्लीत घडामोडींना वेग )
वर्षावरील बैठकीसाठी जे आमदार उपस्थित होते. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आता शिवसेनेच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले आहे. कारण अद्याप एकनाथ शिंदेची नाराजी काय आहे? तसेच, एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community