Shiv Sena : ‘ऑपरेशन टायगर’ कोकणातून आता विदर्भाकडे वळले

58
Shiv Sena : 'ऑपरेशन टायगर' कोकणातून आता विदर्भाकडे वळले
  • प्रतिनिधी

कोकणानंतर विदर्भातही पक्षविस्ताराची रणनीती आखत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shiv Sena) ‘ऑपरेशन टायगर’ वेगाने पुढे नेले आहे. शुक्रवारी गोंदिया आणि नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण सभा होणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना उबाठाच्या काही प्रमुख नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित मानला जात आहे.

विदर्भातील नेत्यांची भरती सुरू

कोकणात शिवसेना उबाठाला हादरा दिल्यानंतर शिवसेनेने विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीतील भाजपा आणि अजित पवार गटही विदर्भात आपल्या ताकदीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. (Shiv Sena)

(हेही वाचा – Sourav Ganguly च्या गाडीला दुर्गापूर एक्सप्रेसवेवर अपघात ; लॉरीनं धडक दिली अन्…)

राजकीय समीकरणांमध्ये बदल?

शिवसेनेच्या (Shiv Sena) या हालचालींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही महत्त्वाचे काँग्रेस नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिवसेना मजबूत होत असल्याने शिवसेना उबाठा आणि काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विरोधक झाले सतर्क

ऑपरेशन टायगरच्या हालचालींमुळे शिवसेना उबाठा आणि काँग्रेसही जागरूक झाले आहेत. आपल्या नेत्यांना पक्षात टिकवण्यासाठी बैठका सुरू झाल्या असून, बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. महायुतीकडून येत्या काही दिवसांत आणखी मोठे पक्षप्रवेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.