शपथपत्र लिहून दिलेल्या शिवसैनिकांचीही पक्षातून एक्झिट?

160

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव करत आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण संपूर्णपणे ढवळून निघाले. सुरुवातीला केवळ 40 आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर हळहळू शिवसेनेत उभी फूट पडायला सुरुवात झाली.

शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे शिवसैनिकांच्या निष्ठेचे ओळखपत्र म्हणून ज्या शिवसैनिकांनी शपथपत्र दिले होते, ते शिवसैनिकही आता उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत असल्याचे समोर येत आहे.

(हेही वाचाः …आणि कदमांना अश्रू अनावर, म्हणाले “50 वर्षात जे उभारलं ते पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं”)

शिंदे गटात सामील

शिवसेनेतील उठावानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याच्या बॉंडवर शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून देण्यात आले होते. पण शपथपत्र लिहून दिलेल्या शिवसैनिक सुद्धा शिंदे गटात सहभागी होत असल्याचे दिसत आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराजी असल्याचे सांगत अनेक शिवसैनिकांनी आता शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी शपथपत्र लिहून दिले असतानाही ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

खासदारही शिंदे गटात?

शिवसेनेचे 12 खासदार हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्ली गाठत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे कळत आहे. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाणे, भावना गवळी, हेमंत पाटील,प्रतापराव जाधव,श्रीरंग बारणे, संजय मंडलिक,सदाशिव लोखंडे,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, धैर्यशील माने हे खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! पक्षप्रमुखपदी कोण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.