Cabinet Expansion : शिवसेनेत इच्छुक जास्त असल्याने नाराजीची शक्यता; १३ मंत्री ठरले ?

53
Cabinet Expansion : शिवसेनेत इच्छुक जास्त असल्याने नाराजीची शक्यता; १३ मंत्री ठरले ?
  • प्रतिनिधी

गेल्या पंचवार्षिकला शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना मंत्रीपदापासून वंचित रहावं लागलं होतं. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधूनही, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र आता मुख्यमंत्रीपद हातून गेल्यानंतर किमान मंत्रिमंडळात चांगली खाती हातात घेण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेला तेरा मंत्रि‍पदे मिळतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या मंत्र्यांची नावेही आता काही मिडिया हाऊसने प्रसिद्ध केली आहेत. (Cabinet Expansion)

१४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार ?

पाच डिसेंबरला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर अद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. आता तो येत्या दोन दिवसांत होईल, अशी शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. भाजपाकडून मंत्रीपदासाठी अद्याप काहीच हालचाली सुरु झाल्या नसल्या तरी थेट दिल्लीतून भाजपाची यादी येईल, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे अनेक नेते गेल्यावेळी मंत्रि‍पदापासून वंचित राहिले होते. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. (Cabinet Expansion)

(हेही वाचा – Mumbai Traffic Police : बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; २०९९ चालकांवर कारवाई)

शिवसेनेचीही दिल्लीत झाली चर्चा

दरम्यान, गेल्यावेळी असलेल्या सर्वांनाच शिवसेना देईल, असेही ठरल्याचे समजते. बुधवारी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या संभाव्य नावांवर चर्चा झाली. शिवसेनेला १० ते १२ मंत्रि‍पदे मिळतील. मात्र शिवसेनेने तेरा नावे फायनल केल्याचे समजते. त्यात शिवसेनेचे गेल्यावेळी असणारे गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांचा पुन्हा नव्या मंत्रिमंडळात समावेश असणार आहे. दुसरीकडे गेल्यावेळी मंत्रिपद मिळता मिळता राहिलेले भरतशेठ गोगावले यावेळी पहिल्यांदाच शपथ घेतील, असेही काहींचे म्हणणे आहे. (Cabinet Expansion)

हे तेरा मंत्री घेतील शपथ

शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या जुन्या मंत्र्यांसह भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि आशिष जैस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यातील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, आणि विलास भुमरे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय अतुल सावे, प्रशांत बंब हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मात्र फक्त १३ जणांना संधी मिळणार असल्याने नाराजांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागणार आहे. (Cabinet Expansion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.