…तरीही संजय राऊत काठावर पास

125

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे पहिल्या पसंतीची मते घेऊन निवडून येतील असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात राऊत हे काठावरच पास झाल्याचे दिसून आले. जर राऊत यांना एक मत जरी कमी पडले असते, तरी त्यांचा धोका अधिक वाढला असता. विशेष म्हणजे पहिल्या पसंतीची मते असतानाही सहाव्या क्रमांकावरील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याही पेक्षा कमी मते राऊत यांनी पडली आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार आणि भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये लढत होती. यापैकी सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये चुरस होती.

(हेही वाचाः पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल, फडणवीसांच्या विधानाने खळबळ)

निकालाने हवा काढली

परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रफुल्ल पटेल, प्रतापगढी आणि संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची मते मिळणारच होती. पण यातील राष्ट्रवादीचे पटेल यांना ४३ आणि प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. परंतु महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार ज्यांना पहिल्या पसंतीची मते देण्यात येणार होती, त्या संजय राऊत यांना केवळ ४१ मते मिळाली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेल्या शिवसेना आणि संजय राऊत यांची निकालाने हवाच काढली.

दुस-या पसंतीचे महाडिक सरस

तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे निवडून येणार आणि राज्यसभेत शिवसेनेची एक जागा वाढणार, असा दावा पक्षाने केला होता. परंतु पवार यांना ३३ मते आणि भाजपचे महाडिक यांना ४१ मते मिळाली. महाडिक यांना मिळालेल्या मतांची पूर्णांकामध्ये संख्या जाणून घेतल्यास, संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपच्या दुसऱ्या पसंतीची मते घेणाऱ्या महाडिक यांनी जास्त मते मिळवली,असे दिसून आले आहे.

(हेही वाचाः सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते, फडणवीसांचा राऊतांना झणझणीत टोला)

भुजबळांनीही दिली कबुली

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना आमचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही आम्ही सहावी जागा मिळवण्यात कमी पडलो आणि राऊत हे थोडक्यात वाचले असल्याचे सांगितले. संजय पवार हे जिंकले असते आणि राऊत हे हरले असते,असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः नशीब… राऊत काठावर वाचले, भुजबळांनीच दिली कबुली)

संजय राऊत झाले ट्रोल

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्हाला कोणी शिकवू नये, निवडणूक कशी लढवायची हे आम्हाला माहीत आहे. अशा किती निवडणूका आम्ही लढलो आहोत,असे सांगितले होते. परंतु एवढ्या निवडणुकांचा अनुभव असलेल्या शिवसेनेच्या आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला काठावर पास होण्याइतपत मते मिळवता आली. मग कुठे गेला तो एवढ्या निवडणूक लढवण्याचा अनुभव, असा सवाल करत राऊत यांना सोशल मिडियावरून ट्रोल केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.