“…तर शिंदेच्या बाणापुढे ‘त्यांचा’ बाण टिकू शकणार नाही”

126

कोणत्याही राज्यात असा मुख्यमंत्री होणार नाही जसा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही. माझ्या मतदारसंघातील हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त असूनही ते मला निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे. जुन्या शिवसेनेचा कोणताही बाण आला तरी शिंदे गटाच्या बाणा पुढे तो टिकू शकणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

(हेही वाचा – ‘तुमचा हाच अ‍ॅटिट्यूड असेल तर मी यापुढे बोलणार नाही’, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांची भूमिका)

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या सत्काराचं आयोजन केले होते. औरंगाबादच्या आमदारांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथील शक्तिप्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे सरकारमधील आमदारांनी उपस्थिती लावली होती. शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. त्याबरोबर उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावत ते पुढे म्हणाले, शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगरपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना साधा पेन चालवण्यात अडचणी होत्या पण आता ती अडचण शिंदेंनी सोडवली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानत सत्तार असेही म्हणाले की, त्यांच्या उपकारांची परतफेड आम्ही करू शकत नाही.

ज्यांना अक्कल नाही तेही नक्कल करतात

ज्याला काही अक्कल नाही तेही नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही इमानदार राहिलो आमि शिवसेनेचे विधानपरिषद उमेदवार निवडून दिले. आम्ही दगाफटका केला नाही. यापुढे शिंदेंचं कौतुक करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनसामान्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री आहे. कारण आतापर्यंत लेना बँका बघितल्या पण महाराष्ट्रातील देना बँक म्हणजे शिंदे साहेब.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.