गद्दार कोण? हे वरळी विधानसभेतील मतदारच सांगतील, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

145

शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले. त्याच वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने काम केले. युतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना वरळीच्या मतदारांनी निवडून दिले आणि आशीर्वादही दिला. मात्र त्यांची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणं ही गद्दाराची व्याख्या कशी होऊ शकते…हे पहिले तपासून पाहावं लागेल. गद्दार कोण हे वरळी विधानसभेतील मतदार येणाऱ्या निवडणुकीतच देतील, असे म्हणत राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.

या गोष्टींचा सर्वोच्च न्यायालयात टिकाव लागणार नाही

यासह लोकसभा गटनेतेपदाचे पत्र 18 जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना दिले होते, असे म्हणत त्यांनी दावा केला. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पत्र देण्याची कायदेशीर पूर्तता आम्ही 18 तारखेला केली आणि परिपत्रक 19 जुलै रोजी निघाले. चिराग पासवान प्रकरणातही तेच झालं. त्यावेळी चिराग पासवान यांच्या काकांना गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आले. तसा उच्च न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. त्यामुळे विनायक राऊत बोलतात त्यामध्ये तथ्य नाही. सर्व गोष्टीची कायदेशीर पूर्तता झाली असल्याने या गोष्टींचा सर्वोच्च न्यायालयात टिकाव लागणार नाही. अर्जाचं सबमिशन 18 तारखेचं आहे. त्यामुळे 18 किंवा 19 या तारखेचा कोणताही वाद नाही. लोकसभा अध्यक्षांनी सर्व गोष्टीची पूर्तता केली आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले “….दरवाजे उघडेच आहेत”)

युती म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार

युती म्हणून लोकसभा लढवणार असल्याचे सांगत शेवाळे म्हणाले,  शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच 2014 आणि 2019 साली आम्ही निवडणूक लढवली आहे. यावेळी मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. तसेच बाळासाहेबांच्या विचारांनाही कौल दिला आणि 2014 आणि 2019 साली लोकांनी विश्वास ठेवला. यानुसार, या आधीच्या निवडणुकीत आम्ही जे काही केलं तेच 2024 च्या निवडणुकीत करणार आहोत. युती म्हणूनच आम्ही नागरिकांकडे आशीर्वाद मागायला जाणार आहोत. 2014 आणि 2019 साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी आम्हाला जास्त मतं मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.