उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे ‘भावना’ दुखावल्या, प्रतोद पदावरुन हटवले

92

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेने आता सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच आता शिवसेनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याजागी आता शिवसेना खासदार राजन विचारे यांची वर्णी लावण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवल्याचे कळवले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ‘भाजप आमची शत्रू नाही, पण…’, दीपाली सय्यद यांचं ट्वीट)

गवळींनी केले होते शिंदेंचे समर्थन

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी देखील त्यांचे समर्थन केले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करण्याची अप्रत्यक्ष मागणी केली होती. त्यामुळे लोकसभेत व्हीप कोणाचा लागू होणार यावरून कोणती गडबड होऊ नये यासाठी शिवसेना नेतृत्वाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडी चौकशी प्रकरणात अडकलेल्या खासदार भावना गवळी गेले काही महिने पक्षाच्या लोकसभा कामकाजाच्या कार्यवाहिसाठी उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.