जे शिवसेना आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर बुधवारी वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे शिवसैनिक, कार्यकर्ते रस्त्यावर होते, ती खरी शिवसेना, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच ईडीच्या दबावामुळे आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. स्वतः वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
(हेही वाचा – ‘शिंदे’ गटाची संख्या वाढता वाढता वाढे! ‘हे’ मोठे आमदारही गुवाहाटीत)
काय म्हणाले संजय राऊत
भाजपच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित प्रदेशात आमदारांना डांबून ठेवण शक्य नाही. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, उद्धव ठाकरे आज कोणतीही बैठक घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आवाहन केलेलं नाही, त्यांनी परत येऊन लढून दाखवावं. आजही अनेक कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले आहेत. कोणत्या परिस्थितीत हे आमदार शिवसेना सोडून गेले आणि का गेले? याचा खुलासा लवकच होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदे गटात आमदार का चाललेत? हे लवकरच समजेल
बुधवारी वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे शिवसैनिक, कार्यकर्ते रस्त्यावर होते, ती खरी शिवसेना. तो खरा पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असे नाही होत. हे आमदार शिंदे गटात का गेलेत सोडून, याची कारणं लवकरच समोर येतील, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
….मात्र आम्ही पक्ष सोडलेला नाही
मी पळून गेलेल्या या आमदारांना बंडखोर मानत नाही. आमच्या संपर्कात 20 आमदार आहेत. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हाच या सगळ्याबाबत खुलासा होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही काम केले आहे, त्यामुळे अशा संकटांचा अनुभव आहे. ईडीच्या दबामुळे हे आमदार पळाले असावेत, माझ्यावरही ईडीचा दबाव आहे, मात्र आम्ही पक्ष सोडलेला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहू असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.