पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेत शिवसेनेचा खोडा, झाडे कापण्याचे तिन्ही प्रस्ताव परत पाठवले

111

पश्चिम रेल्वे मार्गावरील खार ते जोगेश्वरी दरम्यान बनवण्यात येणाऱ्या हार्बर रेल्वे लोकलसाठीच्या सहाव्या मार्गाच्या बांधकामाला आता शिवसेनेकडून खो घालण्यात येत आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणापुढे या प्रकल्पामुळे बाधित होणारी झाडे कापण्यास परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु याबाबतचे तिन्ही प्रस्ताव प्राधिकरणाने फेटाळत प्रशासनाकडे परत पाठवले आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या हार्बर रेल्वेसाठी सहाव्या मार्गिका बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. खार ते जोगेश्वरी दरम्यान या मार्गिकेमुळे बाधित होणारी ६७ झाडे कापण्यास आणि ७५ झाडे पुनर्रोपित करण्याचे तिन्ही प्रस्ताव प्राधिकरणाचे अध्यक्ष इक्बालसिंह चहल यांनी दप्तरी दाखल केले.

(हेही वाचाः सांताक्रुझ आणि घाटकोपर मेट्रोदरम्यान झाडे कापण्याचा प्रस्ताव शासनाकडे)

प्रस्ताव पाठवला परत

जोगेश्वरी स्टेशन ते राममंदिर स्टेशन येथील बीसीटी-बीव्हीआयच्या दरम्यान प्रस्तावित पूल व मातीकामाच्या कामांत येणाऱ्या ६८ झाडांपैकी ९ झाडे कापण्यास आणि ५७ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत दप्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर उर्वरित दोन म्हणजे अंधेरी स्टेशन ते आंबोली फाटकपर्यंत ६९ झाडांपैकी ३५ झाडे कापण्यास आणि १५ झाडे पुनर्रोपित करण्यास आणि सांताक्रुझ पूर्व ते खार पूर्व दरम्यान रेल्वेच्या ६व्या लाईन मार्गिकेच्या नियोजित बांधकामात येणाऱ्या एकूण ३९ झाडांपैकी २३ झाडे कापण्यास आणि ३ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणापुढे आला असता प्राधिकरणाच्या बैठकीत ते दप्तरी दाखल करत प्रशासनाकडे परत पाठवून दिले.

सदस्यांना पडला प्रश्न

रेल्वे प्रशासन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने राज्यात आणि महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने हे प्रस्ताव परत पाठवत एकप्रकारे प्रशासनाला हाताशी धरुन हे प्रस्ताव परत पाठवल्याचे बोलले जात आहे. या प्रस्ताव परत पाठवताना कोणत्याही प्रकारची कारणे अध्यक्षांनी दिली नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव परत पाठवण्याचे कारण काय हा प्रश्न खुद्द सदस्यांनाच पडला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे सभा असल्याने याची कारणे कुठल्याही सदस्याला समजू शकली नाहीत. त्यामुळे या तिन्ही दप्तरी दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये राजकारण असल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचाः भाजपाचा निशाणा लागला: फडणवीस यांच्या पत्रानुसारच रस्ते कामांच्या फेरनिविदा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.