मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलातून कोण कोणाची तुतारी वाजवत आहे? हे महाराष्ट्राला कळले असल्याची टीका शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेकडून जरांगे यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला. आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे की, राजकारण आहे? याचा विचार आता मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्राने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी रविवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या वाघमारे यांनी या प्रकरणावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कोण कोणाची तुतारी वाज आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं असल्याचं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई ‘डिफेन्स एक्स्पो 2024’ ला भेट दिली)
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पहिल्यांदा सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानादेखील दोन वेळा मनोज जरांगे-पाटील यांना भेटायला गेले होते. आता सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्यात आल्या असल्या तरी आंदोलनाची भाषा होत असेल, तर आंदोलनाचा उद्देश आरक्षण की राजकारण? याचा विचार सर्व मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्राने करावा, असे त्यांनी या
हेही पहा –