शिवसेनेचा यू-टर्न! आता किती जागा लढणार?

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची कार्यकारणीने तयारी केली आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र अवघ्या 24 तासांत शिवसेनेने यू-टर्न घेतला असून, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना फक्त 100 जागा लढवणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80 ते 100 जागा लढवणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची कार्यकारणीने तयारी केली आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत

गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करू शकतो, गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत, या संघटना आमच्यासोबत यायला तयार आहेत. खासकरुन पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे राऊत यांनी सांगितले.

(हेही वाचाः शिवसेना आता योगींना टक्कर देणार! पण राज्याबाहेर शिवसेनेची ‘ही’ अवस्था)

…तर एकटे लढू

गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील काही शेतकरी संघटनांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे इतर काही लहान पक्ष आहेत त्यांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे, त्याला कितपत यश येते त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही. पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यामध्ये सहभागी होऊ शकेल, असं देखील राऊत म्हणाले.

(हेही वाचाः उत्तर प्रदेशातही फडकणार शिवसेनेचा भगवा?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here