Shiv Sena: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त टीझर जारी

142

शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन रविवारी साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हाॅटे वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि सोमवारी होणा-या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत. यात हिंदुत्व आणि भगव्याचे राजकारण यावर भाष्य करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हाॅटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

( हेही वाचा :आसाममध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; 19 लाख लोक प्रभावित )

ट्विट करत दिल्या शुभेच्छा 

५६ वर्षे जनसेवेची.. प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने तळपत्या शिवसेनेची… पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.