मुंबई प्रतिनिधी:
Sanjay Nirupam : शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठावर (Shivsena UBT) जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्ष कृत्रिम झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा – Murder By Maulana : मौलानाने दुकानात पुरला अल्पवयीन मुलाचा मृतदेह; अल्पवयीन मुलांवर करीत होता लैगिंक अत्याचार)
निरुपम म्हणाले, उबाठा गटाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बाळासाहेबांचे भाषण दाखवले, पण खरेतर हा गटच कृत्रिम झाला आहे. सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि विचार सोडले. “काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, गेलो तर शिवसेनेचे दुकान बंद करेन,” असे बाळासाहेब म्हणाले होते. मात्र, उबाठाने खुर्चीसाठी काँग्रेसशी (Congress) हातमिळवणी करून शिवसेना (Shivsena) काँग्रेसच्या दावणीला बांधली, असा टोला त्यांनी लगावला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला (Waqf Board Amendment Bill) विरोध करणारा उबाठा गट पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला.
(हेही वाचा – Amaravati Airport : अमरावती-मुंबई विमानभाडे डबल; अनेकांचा हिरमोड)
वक्फ बोर्ड कायद्यावर निरुपम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू आहे. वक्फ बोर्ड ही बिगर धार्मिक संस्था असून मंदिर ट्रस्टशी त्याची तुलना चुकीची आहे. सरकारचा जमिनी ताब्यात घेण्याचा हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर निरुपम यांनी उबाठाच्या टीकेला राजकीय ढोंग ठरवले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे (New National Education Policy) मराठी मुले मराठी, हिंदी आणि इंग्रजीत पारंगत होतील, असे ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community