शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटातील गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे. (Kankavli Assembly)
अतुल रावराणे यांनी आपल्या राजीनाम्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गटबाजीचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत, नाईकांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतृत्व कमजोर होत असल्याची चर्चा आहे. (Kankavli Assembly)
यापूर्वी, शिवसेनेचे आणखी एक नेते राजन साळवी यांनीही विनायक राऊत यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली होती. या घटनांमुळे ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. (Kankavli Assembly)
(हेही वाचा- राज्यभरात सार्वजनिक बसचा तुटवडा: 1 लाख प्रवाशांमागे फक्त 60 बसेस; ITDP Report मधून ही माहिती आली समोर )
अतुल रावराणे यांच्या राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, ते भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रावराणे यांनी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. (Kankavli Assembly)
ठाकरे गटासाठी कोकण हा नेहमीच महत्त्वाचा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, सध्या ठाकरे गटातील गटबाजी आणि नेत्यांमधील नाराजीमुळे पक्षाची ताकद कमी होत असल्याचं दिसत आहे. कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या असंतोषामुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत. (Kankavli Assembly)
(हेही वाचा- BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू)
या घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रावराणे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने पक्षातील गटबाजीवर तोडगा काढला नाही, तर आगामी काळात त्यांना आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kankavli Assembly)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community