लोअर परळ येथील डिलाईट रोडवरील उड्डाणपुलाची एक मार्गिका अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झालेले नसतानाही स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन विधान परिषद सदस्य तसेच दोन माजी महापौरांसह एक मार्गिका खुली केली. त्यामुळे जबरदस्तीने एक मार्गिका खुली करण्याचा प्रयत्न केल्याने आदित्य ठाकरेंसह इतरांविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या पुलाचे काम वर वर पाहता पूर्ण झाल्याचे दिसत असले तरी वाहतुकीसाठी खुले करून देताना अंतिम टप्प्यातील सर्व कामांची पाहणी करूनच मार्गिका खुली केली जाणे योग्य असते. त्यामुळे अशाप्रकारे सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप केल्याने महापालिकेच्यातवीने एफआयआर दाखल करण्यासाठी महापालिकेने अर्ज दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Aaditya Thackeray)
डिलाईल पुलाच्या बांधणीमध्ये रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर टाकण्याचे काम ऑगस्ट २०२३ महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, पथदिव्याची कामे हाती घेण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे १० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले आहे. आता पथदिवे, रंगकाम, लेन मार्किंग, सिग्नल यंत्रणा आदी कामे सुरु आहेत. या कामांच्या पूर्ततेनंतर हा पूल वाहतूकीसाठी येत्या ३ ते ४ दिवसात खुला करणे शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. (Aaditya Thackeray)
त्यामुळे या पुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना घेऊन ही एक मार्गिका जबरदस्तीने खुली करण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यांचे कामावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे, जे काम पूर्ण केले त्यांची तपासणी तथा चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच इतरही बाबी तपासणे आवश्यक होते. जोवर यासर्व बाबी पडताळून तपासणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर तो मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. त्यामुळे अशाप्रकारे अनधिकृतपणे मार्गिक खुली करून एकप्रकारे सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप करतानाच जर यानंतर त्याठिकाणी कुठली दुघर्टना घडली असती तर त्याला जबाबदार कुणाला धरले गेले असते? त्यामुळे सर्व प्रकारची पाहणी आणि सर्व प्रकारची कामे पूर्ण झाल्याची खात्री होत नाही तोवर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिलेला असताना जर अशाप्रकारचे कृत्य आदित्य ठाकरे यांच्याकडून झाल्याने या कृतीला चाप बसण्यासाठी हा एफआयआर दाखल केला असल्याचे बोलले जात आहे. (Aaditya Thackeray)
(हेही वाचा – Maratha Reservation : शरद पवारांवर टीका केली म्हणून लेखक नामदेव जाधवांच्या तोंडाला फासले काळे)
आज या विरोधात कोणतीही पावले महापालिकेने न उचलल्यास भविष्यात अर्धवट राहिलेल्या प्रकल्पही सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे हा एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला असावा असे महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बऱ्याव वेळा इतरांना काम पूर्ण झाल्याचे दिसत असले तरी बारीक सारीक कामे ही बाकी असतात आणि त्यामुळे काही दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे या छोट्यात छोट्या कांमांची पाहणी झाल्यानंतर आणि ती कामे पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला जातो, पण अशाप्रकारे कुठल्याही लोकप्रतिनिधींने असा प्रकार करणे हे योग्य नाही,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Aaditya Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community