Shiv Sena UBT : भायखळ्यातील काँग्रेसच्या बंडखोरीला धारावीतून उत्तर

347
Shiv Sena UBT : भायखळ्यातील काँग्रेसच्या बंडखोरीला धारावीतून उत्तर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाविकास आघाडीमध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघ हा उबाठा शिवसेना (Shiv Sena UBT) आणि धारावी विधानसभा हा काँग्रेसला सुटल्यानंतर त्यानुसार दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु भायखळ्यात काँग्रेसच्यावतीने मधु चव्हाण यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर याला प्रत्युत्तर धारावीतून दिले जाणार आहे. धारावीतून उबाठा शिवसेनेने माजी आमदार बाबुराव माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या भगिनीसमोरच आव्हान निर्माण केल्याने जर भायखळ्यातून काँग्रेसच्या बंडखोराने अर्ज मागे न घेतल्यास याचा फटका धारावीत बसणार आहे.

(हेही वाचा – Diwali 2024 : दिवाळीत हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी करू नका; हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आवाहन)

भायखळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने उबाठा शिवसेनेकडून मनोज जामसुतकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असतानाही काँग्रेसच्यावतीने माजी आमदार मधु चव्हाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, महाविकास आघाडीमध्येच भायखळ्यात बंडखोरी झाल्यामुळे तसेच उबाठा शिवसेनेच्या (Shiv Sena UBT) उमेदवारासमोरच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने धारावीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या समोरच उबाठा शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ज्योती गायकवाड यांच्या विरोधात जोरदार आव्हानच माने यांनी निर्माण केले आहे.

(हेही वाचा – Bhandup मधील शिवसेना उबाठाच्या भोंग्याचे ध्वनिप्रदूषण Congress ने केले कमी!)

त्यामुळे भायखळ्यातून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास धारावीतून माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील. अन्यथा भायखळ्यात जर बंडखोरी कायम राहिल्यास धारावीतून उबाठाचे शिवसेनेचे माने हे आपला अर्ज मागे न घेता थेट लढतच देणार असल्याने आधीच काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध त्यातच माने यांचे आव्हान पाहता गायकवाड यांच्यासमोरील अडचणीत आणखीन भर पडली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.