- खास प्रतिनिधी
मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठाकडून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना कुर्ला मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक तसेच संभाजी ब्रिगेड या संघटनेचा प्रखर विरोध होत आहे.
संभाजी ब्रिगेड संघटना आणि उबाठा यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली असून संभाजी ब्रिगेडने उबाठाकडे काही जागांची मागणीदेखील केल्याचे समजते.
(हेही वाचा – Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड)
मराठाविरोधी खोट्या अॅट्रॉसिटी तक्रारी
संभाजी ब्रिगेडकडून तर उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मोरजकर यांना संभाजी ब्रिगेडचा विरोध असून संघटना मोरजकर यांच्यासाठी काम करणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मोरजकर या मराठाविरोधी असून त्यांनी आतापर्यंत ११ मराठा व्यक्तींविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रारी दाखल केल्या असून त्या सर्व खोट्या तक्रारी असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.
कुर्ला मतदारसंघात विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर हे शिवसेना पक्षाचे असून पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे कुडाळकर यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांच्याविरुद्ध उबाठाकडून (Shiv Sena UBT) मोरजकर यांचे नावे चर्चेत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community