Shiv Sena UBT चा Congress च्या वोट-बँकेवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न

गेल्या शनिवारी १० फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी धारवीत एक जाहीर सभा आयोजित करून धारावी झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा धगधगत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. या ठिकाणी भाषण करताना जमावात काही प्रमाणात मुस्लिम समुदाय दिसताच त्यांनी मराठी भाषण बंद करून हिंदीतून भाषणाला सुरुवात केली.

355
काँग्रेसच्या सर्वेमध्ये Shiv Sena UBT तिसऱ्या स्थानावर; याचा नेमका अर्थ काय?

एकीकडे दिग्गज नेत्यांच्या गळतीमुळे काँग्रेस (Congress) पक्ष बेजार झालेला असताना, शिवसेना उबाठा गटाने थेट काँग्रेसचा पारंपरिक मतदारच पळवून नेण्याचा प्लॅन केल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून उबाठाचा डोळा अल्पसंख्याक मतदारांवर (Voters) असून यामुळे भविष्यात काँग्रेसला दूरगामी मोठा फटका बसू शकतो. (Shiv Sena UBT)

काँग्रेसला धक्क्यावर धक्के

काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shide) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर १० फेब्रुवारीला शनिवारी काँग्रेसचे राज्यातील माजी मंत्री बाबा सिद्दीकी (baba Siddique) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आणि आता तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्षातून बाहेर पडले आणि भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस, असे धक्क्यावर धक्के झेलत असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उबाठाने त्यांच्या वोट बँकेवरच (Vote bank) डल्ला मारण्याची तयारी केली आहे. (Shiv Sena UBT)

मराठी भाषण बंद करून हिंदीतून सुरू

गेल्या शनिवारी १० फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी धारवीत एक जाहीर सभा आयोजित करून धारावी झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा धगधगत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. या ठिकाणी भाषण करताना जमावात काही प्रमाणात मुस्लिम समुदाय दिसताच त्यांनी मराठी भाषण बंद करून हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. तसेच मध्ये मध्ये हिंदीत बोलून अमराठी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार?; काय आहे कारण ?)

विकासाचे राजकारण करणाऱ्या भाजपवर टीका

सोमवारी १२ फेब्रुवारीला उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांची बाजू समजावून सांगताना मुस्लिम समाजाचा (Muslim community) कसा पाठींबा मिळतो आहे हे सांगताना राम मंदिर उभारणाऱ्या आणि विकासाचे राजकारण करणाऱ्या भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. (Shiv Sena UBT)

हिंदुत्वाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न

“उद्धव यांनी सांगितले की या देशात मुसलमान, ख्रिस्ती (Christian) अशा सर्व समजाना घाबरवले जात आहे. हे समाज आणि आणि हिंदू (Hindu) यांच्यात दरी निर्माण करून आपसात भांडणे लावली जात आहेत. यामुळे देशाला धोका आहे. म्हणून पूर्ण देशातील गरीब, सामान्य मुसलमान, त्यांचे नेते, कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. आणि ते आम्हाला त्याचे कारण सांगताना म्हणतात की तुमचे हिंदुत्व (Hindutva) हे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे,” असे सांगून राऊत यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.