Shiv Sena UBT चे मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन, मुस्लिम हुतात्म्यांची नावे इंडिया गेट वर लावा : संजय राऊत

323
Shiv Sena UBT चे मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन, मुस्लिम हुतात्म्यांची नावे इंडिया गेट वर लावा : संजय राऊत

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठाला मुस्लिम मतांनी तारले, असे स्पष्ट झाल्याने उबाठाने आता मुस्लिम समाजाला गोंजारण्यास सुरुवात केल्याचे दिसते. सोमवारी सकाळच्या सत्रातील पत्रकार परिषदेत प्रवक्ते संजय राऊत यांनी मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करीत देशासाठी, स्वातंत्र्यलढ्यात युद्धात ज्या मुस्लिमांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले त्यांची नावे इंडिया गेटवर लावा, असा सल्ला दिला. (Shiv Sena UBT)

उत्तर प्रदेशवर प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या हॉटेल आणि धाबेवाल्या मालकांनी आपली नावे दुकानांवर लिहावीत असा आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढला. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या बाजूने उभे रहात त्यांची बाजू उचलून धरली. “जर तुम्हाला त्या धाब्यावरील मुसलमानांची नावे पाहिजे आहेत तर या देशासाठी स्वातंत्र्यलढ्यात, युद्धात, संघर्षात ज्या लाखों मुस्लिम जवानांनी बलिदान दिले त्यांची नावे इंडिया गेटवर लावा.” “ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीदपाऊण कारगिल युद्धात, मणीपुर, जम्मू काश्मीर अनेक मुस्लिम बांधवांनी जे हौतात्म्य दिले आहे त्यांची नावेही ठिकठिकाणी लावायला हवीत. तसेच आरएसएस, भाजपाने किती हुतात्मे दिले तेही सांगा,” असे राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Democracy Day : ‘म्हाडा’त संजीव जयस्वाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या)

नावे का लावावी?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेकरुंचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खानावळी, भोजनालये, रेस्टॉरंट्स, धाबे, खाद्यपदार्थांच्या गाड्या अशा सर्वांनाच आपली ओळख दर्शनी भागात एक फलक लावून उघड करावी असा निर्णय सरकारने घेतला होता. काही मुस्लीम विक्रेते हिंदू नाव धारण करुन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेश राज्य सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी केला होता. (Shiv Sena UBT)

बाळासाहेबांनी ‘हे’ राजकारण केले नाही

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह राज्यातील विविध मतदार संघांमध्ये मुस्लिम समाजाची मते उबाठाला गेल्याचे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. तेव्हापासून उबाठाने मुस्लिम समाजाविरुद्ध कुठेही आवाज उठवला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेनेने कधीही मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन राजकारण केले नाही मात्र गेल्या २-३ महिन्यांपासून मराठी मते विरोधात गेली तरी चालतील पण मुस्लिम मते पक्षासोबत ठेवण्याची भूमिका उबाठाने घेतल्याचे चित्र दिसत आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.