Shiv Sena UBT उमेदवाराचा ३०-वर्षीय कमावता मुलगा अवलंबीत?

86
Shiv Sena UBT उमेदवाराचा ३०-वर्षीय कमावता मुलगा अवलंबीत?
Shiv Sena UBT उमेदवाराचा ३०-वर्षीय कमावता मुलगा अवलंबीत?
  • सुजित महामुलकर

शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) एका उमेदवाराने निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात आपल्या ३० वर्षाच्या लग्न झालेल्या कमावत्या मुलाला अवलंबीत दाखवले आहे आणि ‘त्या’ अवलंबीत मुलानेही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, हे विशेष.

राष्ट्रवादीतून ‘उबाठा’त!

शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदार संघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतेही इच्छुक होते. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे नेते माजी आमदार राहुल जगताप यांनी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ‘खोके घेऊन अनुराधा नागवडे यांना तिकीट विकल्याचा’ गंभीर आरोप केला आहे. जगताप यांनी राऊत यांचे नाव घेतले असले तरी त्यांचा रोख हा ‘मातोश्री’वर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण विधानसभेच उबाठाचे तिकीट देण्याचा अधिकार हा फक्त उद्धव ठाकरे यांनाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देत राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी मुंबईत शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटात प्रवेश केला. आणि लगेचच त्यांना श्रीगोंदा मतदारसंघासाठी एबी फॉर्मही देण्यात आला.

(हेही वाचा – Diwali च्या फटाक्यांनी प्रदूषण होते अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी अंनिसवाले वर्षभर कुठे असतात?)

व्यवसाय शेती पण अवलंबीत

श्रीगोंदा मतदार संघातून राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी उबाठाकडून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांचे ३०-वर्षीय विवाहित पुत्र पृथ्वीराज नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अनुराधा नागवडे यांनी पृथ्वीराज हे अवलंबीत असल्याचे आपल्या प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे. तर पृथ्वीराज यांनी स्वतः दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात स्वतःचा व्यवसाय शेती आणि सामाजिक कार्य आहे, असे प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.

काही तक्रार नाही.

याच मतदार संघातून प्रतिभा बबनराव पाचपुते आणि त्यांचे पुत्र विक्रम यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. नागवडे यांच्या ‘अवलंबीत’ प्रकरणाबाबत विक्रम यांना विचारले असता, “अनुराधा नागवडे यांनी ३० -वर्षीय लग्न झालेल्या कमावत्या मुलांचे नाव अवलंबीत म्हणून प्रतिज्ञा पत्रात नमूद केले तरी आमची काही तक्रार नाही. तो त्यांचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केली.

निवडणूक अर्ज बाद

दरम्यान, राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. एका राजकीय विश्लेषकाच्या मते, “३०-वर्षीय लग्न झालेला कमावता मुलगा अवलंबीत दाखवणे चूक असून अनुराधा नागवडे यांचा निवडणूक अर्ज बाद होऊ शकतो,” असे मत व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.