‘हाता’ च्या आधाराशिवाय Shiv Sena UBT ला जिंकता येणार नाही विधानसभा निवडणूक

194
'हाता' च्या आधाराशिवाय Shiv Sena UBT ला जिंकता येणार नाही विधानसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर उबाठा शिवसेनेचा बाहुंमध्ये शंभर हत्तींचे बळ भरले असले तरी प्रत्यक्षात शिवसेना म्हणून त्यांच्या परंपरागत मतदारांनी नाकारले आहे. काँग्रेससोबतच्या आघाडीमुळे मुस्लिम मतदारांनी दाखवलेल्या हातांमुळेच उबाठा शिवसेनेचे ०९ खासदार निवडून आले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीतील पिच आपल्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात असले तरी या निवडणुकीत मुस्लिमांच्या हाताभाराशिवाय उबाठा शिवसेनेला आमदार निवडून आणणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. (Shiv Sena UBT)

लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आहेत. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत. तसेच उत्तर पश्चिम मतदार संघातून केवळ ४८ मतांनी पराभूत झालेले उमेदवार अमोल किर्तीकर यांना मुस्लिम मतांसह काँग्रेसच्या मतदारांनी अधिक हात दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (Shiv Sena UBT)

शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मतांच्या जोरावर उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना अधिकची मते मिळाली आहे. भांडुप, विक्रोळी, चांदिवली, चेंबूर, कुर्ला, वांद्रे पूर्व, कलिना, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, शिवडी आणि भायखळा या मतदार संघात मुस्लिम आणि काँग्रेसच्या मतांवर उबाठा उमेदवाराला अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. (Shiv Sena UBT)

मात्र, विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहिल्यास मुस्लिम आणि काँग्रेसच्या मतांच्या जोरावर उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवता येईल. मात्र, उबाठा शिवसेनेच्या विद्यमान आमदार तथा उमेदवारांना आघाडीच्या पाठबळाशिवाय निवडणूक लढवणे कठीण झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महायुतीच्या उमेदवारांपुढे ते कडवे आव्हान निर्माण करू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, मुस्लिमांच्या मतांशिवाय आणि काँग्रेसची साथ मिळाल्याशिवाय उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना विजय शक्यच नसल्याचे बोलले जात आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – अजित पवार गटाचे अर्धे लोक Mahayuti मध्ये नाराज? बड्या नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ)

ईशान्य मुंबईतील विधानसभा महायुती उमेदवार महाविकास उमेदवार मताधिक्य

विक्रोळी ——- – — ५२,८०२ ——६८,६७२———–(आघाडी १५,८७०)

भांडुप ——- – — ७५,६५९ —— ७९,११७———–(आघाडी ३,४५८)

चांदिवली——- – — ९८,६६१ ——१,०२,९८५———–(आघाडी ४,३२४)

चेंबूर ——- – — ३९,८२० ——६१,३५५———– (आघाडी २१,५३५)

कुर्ला ——- – — ५८, ५५३ ———८२,११७———– (आघाडी २३,५६४)

कलिना ——- – — ५१,३२८ ——६७,६२०———– (आघाडी १६,२९२)

वांद्रे पूर्व ——- – — ४७,५५९ —— ७५,०१३———– (आघाडी २७,४५४)

जोगश्वरी पूर्व——- – — ७२,११८ ——८३,४०९———–(आघाडी ११,२९१)

दिंडोशी ——- – — ७५,७६८ —— ७७,४६९———– (आघाडी १,७०१)

अंधेरी पश्चिम ——- – — ७०,७४३ ——७०,५२२———–(युती १७१)

अंधेरी पूर्व ——- – — ७८,७६४ ——६८,६४८———–(युती १०,११६)

माहिम ——- – — ६९,४८८ —— ५५,४९८———– (युती १३,९९०)

वरळी——- – — ५८,१२९ ——६४,८४४———–(आघाडी ६,७१५)

शिवडी ——- – — ५९,१५० —— ७६,०५३———– (आघाडी १६,९०३)

भायखळा——- – — ४०,८१७ —— ८६,८८३———–(आघाडी ४६,६९) 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.