Shiv Sena UBT चे शरद पवार यांना आव्हान; २८८ जागा लढण्याची तयारी

76
Shiv Sena UBT चे शरद पवार यांना आव्हान; २८८ जागा लढण्याची तयारी
  • खास प्रतिनिधी 

काँग्रेसशी विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) आता शरद पवार यांनाही डिवचले. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे जाऊन परस्पर विधानसभा उमेदवार जाहीर करणाऱ्या शिवसेना उबाठाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी चांगलेच कान टोचले. तर उबाठानही पवार यांना थेट आव्हान देत आमची २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – पीएमआरडीएची Pune Metro ला पुन्हा नोटीस!)

पवार यांनी सुनावले

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगोंदा येथे जाऊन उबाठाचा उमेदवार जाहीर केला आणि पुढचा आमदार हा उबाठाचा असेल असे जाहीर केले. त्याचा शरद पवार यांनी समाचार घेत ‘शिवसेनेचे एक नेते तुमच्या तालुक्यात आले आही उमेदवार जाहीर केला. असे उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशाप्रकारे हा निर्णय होणार नाही,’ असे सुनावले.

(हेही वाचा – Tirupati Balaji Laddu Adulteration प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची Supreme Court मध्ये मागणी)

उबाठा स्वबळावर लढणार?

त्याला उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते राऊत यांनी उत्तर देत वादात भर टाकली. “शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे,” असे सांगत “प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षातील उमेदवाराला काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत,” असे राऊत म्हणाले. इतकेच नाही तर राऊत यांनी पुढे जात शरद पवार यांनाच वेळ पडली तर स्वबळावर उबाठा लढू शकरे असा इशाराही दिला, “२८८ मतदारसंघात आमची तयारी आहे,” असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा – Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता)

काँग्रेसचे तोंडसुख

काँग्रेसनेही मग उबाठावर (Shiv Sena UBT) तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “पवार साहेब म्हणतात ते खरं आहे. जागावाटापाबाबत कुठलाही निर्णय झाल्याशिवाय जागा जाहीर करने चुकीचे आहे. आमच्याकडे मोठी रांग आहे पण काँग्रेस अशाप्रकारे कधीही उमेदवार घोषित करत नाही.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.