राष्ट्रवादीसोबत घरोबा; Shiv Sena UBT ला पक्ष कार्यालयाचाही विसर?

86
राष्ट्रवादीसोबत घरोबा; Shiv Sena UBT ला पक्ष कार्यालयाचाही विसर?
  • खास प्रतिनिधी

शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर स्वतःच्या पक्ष कार्यालयाचाही विसर पडला का? असा सवाल शिवसैनिक विचारू लागले आहेत.

शिवायल, सेना भवन अपेक्षित

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा ‘शिवबंधन’ कार्यअहवाल प्रकाशन सोहळा शुक्रवारी ७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी संध्याकाळी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. मात्र हा सोहळा मंत्रालय परिसरातील शिवसेना पक्ष कार्यालय ‘शिवालय’ किंवा दादर पश्चिम येथील मुख्यालय ‘शिवसेना भवन’ या ठिकाणी होणे अपेक्षित होते.

(हेही वाचा – Dhananjay Munde यांच्या अडचणीत वाढ; Chhagan Bhujbal यांच्या आशा पल्लवित!)

शिवसैनिकांमध्ये आश्चर्य

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उबाठा नेते आणि विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या दानवे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आणि उपस्थित राहणारे शिवसेना उबाठा कार्यकर्ते, असे असताना हा कार्यक्रम शरद पवार यांच्या अधिपत्याखालील मंत्रालयाजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर या इमारतीत झाला. यामुळे शिवसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच शरद पवार यांचा इतका प्रभाव झाला की आपल्याच पक्ष कार्यालयाचाही विसर पडला? असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जात आहे.

अध्यक्ष शरद पवार

यशवंतराव चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे वर्चस्व असून सेंटरच्या अध्यक्षपदी शरद पवार आहेत तर कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आहेत. या इमारतीत राष्ट्रवादीच्या सगळ्या महत्त्वाच्या बैठका तसेच कार्यक्रम होत असतात. जसे पूर्वी शिवसेनेचेही सगळे महत्त्वाचे कार्यक्रम आणि बैठका ‘शिवसेना भवन’ या दादर येथील मुख्यालयात होत होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.