विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत आधीच रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिवसेना उबाठामध्येही अंतर्गत वाद आहेत. विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना देण्यात आल्यास त्यांच्या पक्षाचे आस लावून बसलेले आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची नाराजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सहन करावी लागणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेतेपद आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना नाकारल्यास त्यांना ‘संरक्षण कवच’ मिळणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
(हेही वाचा – ACB : लाचखोरीच्या ४०२ फायली लालफितीत अडकल्या; २ महिन्यांत १७१ लाचखोरांना बेड्या)
विरोधी पक्ष नेते पद हे घटनात्मक पद असल्याने या पदावर असलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून कारवाई करण्याची वेळ आल्यास पोलिसांना थेट कारवाई करता येत नाही. या पदावरील व्यक्तीस अटक करायची झाल्यास मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप झाले असल्याने त्यांच्याभोवती संशयाचे सावट आहेच. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भूमिका महत्वाची असून या प्रकरणी त्यांच्यासाठी पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community