Legislative Assembly Session : निवडणूक आयुक्त निवडून आला पाहिजे! ठाकरे यांची अजब मागणी

98
Legislative Assembly Session : निवडणूक आयुक्त निवडून आला पाहिजे! ठाकरे यांची अजब मागणी
  • खास प्रतिनिधी

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र आपण हे सगळे मुद्दे विधान परिषद सदस्य या नात्याने सभागृहात मांडणार का, या प्रश्नाला ठाकरे यांनी बगल देत माझे सहकारी मांडतील, असे मोघम उत्तर देत उत्तर देणे टाळले. (Legislative Assembly Session)

(हेही वाचा – MVA सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न; चौकशीसाठी सरकारने नेमली एसआयटी)

मी पक्षप्रमुख

ठाकरे म्हणाले, “जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडेलेले आहेत. माझ्या पक्षाचे सहकारी मांडतील. प्रत्येक पक्षाचा प्रमुख तिथे प्रश्न मंडतोच असे नाही. जसे मोदीजी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) किती वेळा असतात सभागृहात? ते पंतप्रधान आहेत मग खासदार नाहीत का? असे यासंबंध प्रश्न उपस्थित करत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. (Legislative Assembly Session)

(हेही वाचा – Bank Loan Waive Off : बँकांनी १० वर्षांत तब्बल १२ लाख कोटींचं कर्ज केलं माफ)

विचित्र मागणी

पत्रकारांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ वर प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले, “सध्या देशात जे विविध विषय सुरू आहेत, जसे अदानी आणि इतर काही विषय आहेत, त्यापासून लक्ष भरकटवण्यासाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ असे विषय आणले जातात. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या आधी, निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर सरळ मत आहे की, निवडणूक आयुक्तही निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. मग कोणाची मते, कशी घायची ते ठरवावे लागेल. कारण निवडणूक आयुक्त नेमले जाणार असतील आणि ते आम्हाला कायदे शकावणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होता कामा नये. निवडून आले तरच निवडणूक आयुक्त मानले गेले पाहिजे,” असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले आणि पत्रकारही अचंबित झाले. (Legislative Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.