- खास प्रतिनिधी
सव्वा ते दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना ‘राजकारणात एकतर तू राहशील नहीतर मी’ अशा शब्दांत आव्हान देणाऱ्या शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
अहंकारातून मानहानी, हिणवणे, धमक्या, इशारे
नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांचा अहंकार इतका वाढला होता की त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भर प्रचार सभेत ‘टरबूज’ म्हणून (उपस्थित श्रोत्यांकडून) हिणवले. इतकेच नाही चौकशा लावू, आत टाकू या आणि शेवटी ‘एक तर तू राहशील नहीतर मी’ इथपर्यंत धमकीवजा इशारे दिले. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला सत्तेची दिवास्वप्ने पडायला सुरुवात झाली होती आणि त्यातूनच महाविकास आघाडीत ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार’ यावरूनही जुंपली होती. पण निवडणुकीनंतर फडणवीस यांचे राजकारणातील स्थान अधिक बळकट झाले. उपमुख्यमंत्री पदावरून ते मुख्यमंत्री झाले. या धक्क्यातून नुकतेच कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट सावरू लागला आहे. (Uddhav Thackeray)
आता भेटी-गाठी
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अनेकांचे धाबे दणाणले. गेल्या आठवड्यात नागपूरला फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनादरम्यान एक दिवस हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आले. भाजपाविरोधात पत्रकार परिषदेत केवळ राजकीय आरोप केले आणि सभागृहात चकार शब्द न काढता परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान एक दिवस उद्धव (Uddhav Thackeray) आणि आदित्य यांनी फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत, हसत खेळत गप्पाही मारल्या.
(हेही वाचा – GST on Used Cars : वापरलेल्या कार, ईव्हींवरील १८ टक्के जीएसटीची भानगड काय आहे?)
पुढील पाच वर्षांचा अंदाज
त्यांच्यातील हा बदल लपून राहिला नाही. महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेले पाहून ठाकरे यांना पुढील पाच वर्षे कशी जाणार याचा अंदाज आला असावा. त्यामुळे अधिक वाकड्यात न जाता सामोपचराची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसते. (Uddhav Thackeray)
खांद्याला खांदा लाऊन उभा!
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी २४ डिसेंबर २०२४ या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहीत अनधिकृत होर्डिंगच्या निमित्ताने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आदित्य यांनी पत्रात नमूद केले की “आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही, विरोधी पक्ष म्हणून असलो तरी ह्या (अनधिकृत होर्डिंग) गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे. आपण ह्या विषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभा राहील.” (Uddhav Thackeray)
नरमले हे स्पष्टच!
राज्यात विरोधी पक्षातील एकाही पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी आवश्यक २९ चा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे पहिले अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय पार पडले. याबाबत सविस्तर पहिली बातमी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दिली आहे. विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी भाजपाशी जुळवून घेणे गरजेचे असल्याचेही उबाठाच्या लक्षात आले असावे, त्यामुळे फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे आधीच टाळल्याचे दिसून येते. या सर्व घडामोडी लक्षात घेता शिवसेना उबाठा का नरमले हे स्पष्ट होते. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community