Shiv Sena UBT-Congress : उबाठाचे काँग्रेसला आव्हान; मुख्यमंत्री पदाचा चेहेरा दाखवा

165
Shiv Sena UBT-Congress : उबाठाचे काँग्रेसला आव्हान; मुख्यमंत्री पदाचा चेहेरा दाखवा

शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची आठवण करून देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थेट आव्हान देत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा कोण? असा सवाल करत पटोले यांना डिवचले. यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (Shiv Sena UBT-Congress)

नानांच्या जखमेवर मीठ

खरे तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांपैकी स्वतः नाना पटोले एक उमेदवार असून काँग्रेस हायकमांडने महाविकास आघाडी हाच चेहेरा असेल असे ठरले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राऊत यांनीही पटोले यांची फजिती करत पटोले यांनाच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा माहीत असेल तर त्यांनी सांगावा असे आव्हान दिले. त्यात भर घालत, नाना पटोले यांची अडचण मी समजू शकतो, अशा शब्दांत जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Shiv Sena UBT-Congress)

(हेही वाचा – काँग्रेसच्या न्याय यात्रेला BJP मुंबईकरांतर्फे विचारणार “खटाखट ५१ सवाल”)

उबाठाची दादागिरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तसेच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी ठाकरे यांच्या चेहेऱ्याला विरोध करूनही राऊत यांनी मंगळवारी १३ ऑगस्टला पुन्हा एकदा ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे ठासून सांगत महाविकास आघाडीत दादागिरी सुरू केल्याने आघाडीतही अंतर्गत धुसपूस वाढली आहे. “आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार आणि ते कोणीही थांबवू शकत नाही,” असे विधान राऊत यांनी केले. (Shiv Sena UBT-Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.